अब्दुललाटची Super 30 ! !
- navadhiti
- May 9, 2023
- 10:26 am
अब राजा का बेटा राजा नही बनेगा, अब राजा वही बनेगा जो हकदार होगा !
विद्योदय मुक्तांगण परिवाराने तीन वर्षापूर्वी अब्दुललाट गाव व परिसरातील गरजू व हुशार मुलांची रविवार कौशल्य शाळा या रूपाने एक अनोखा शैक्षणिक प्रयोग सुरु केला. वैज्ञानिक दृष्टीकोनात वाढ व्हावी व त्याच्यात जीवन कौशल्याचा विकास व्हावा हा या प्रयत्नाचा मूळ गाभा !
इयत्ता ७ वी व ८ वी प्रत्येकी ४० मुले व १० मार्गदर्शक यांनी मागील तीन वर्षात काम केले. पण १० वी साठी हा रविवार कौशल्य शाळा हा उपक्रम नव्हता. पण या उपक्रमातील काही पालक व माझे गुरु संजय लाटकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता १० वी विज्ञान व गणित या विषयांचे मार्गदर्शन वर्ग वर्षभर घेण्यात आले.
पण हा कोचिंग क्लास नव्हता.
हे होतं मुक्तविद्यापीठ ! !
इथं फी नव्हती सगळ्या पालकांनी मिळून मार्गदर्शन करणाऱ्या दादा ताईना गुरुदक्षिणा द्यायची ठरवली. इथं फक्त चांगले मार्क मिळावे म्हणून फक्त प्रयत्न नाही केले नाहीत, तर चांगले आदर्श नागरिक व्हावेत यासाठी प्रयत्न केले.
या १० वी च्या मुलांनी आपली दिवाळी वृद्धाश्रमात साजरी केली, काही सामाजिक व प्रेरणादायी सिनेमे पाहिले त्यावर चर्चा केल्या. वर्षभर गटचर्चा ,सेमिनार,सराव परीक्षा यांचा व लाटकर सरांच्या हाताखाली तयार झालेले अनेक माजी विद्यार्थी यांचे मार्गदर्शन या सर्वाचे फलित म्हणजे हा निकाल !
Savi institute 2019-20 Result
आपले ,
सार्शा व विनायक
सावि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व मॅथ्स.
विद्योदय मुक्तांगण परिवार
विद्योदय संस्था नेमकी करते काय ? ही लिंक पहा : https://www.facebook.com/vianayak.mali/videos/2735475416538990/