Vidyoday Muktangan Parivar Foundation

शिक्षणाची गोडी टीकावी म्हणून !

गंमत गल्ली शाळा , शाखा 3 , समतानगर , अब्दुल लाट | जून २०२०

माहिती नाही या वर्षी कधी शाळा सुरू होणार ? Online शिक्षण ग्रामीण भागात , छोटया वाडी-वस्तीत गल्लीत पोहचणे म्हणजे अशक्य ! आणि फक्त video पाहणे म्हणजे शिक्षण नाहीच मुळी !

कोरोना सोबत जगत असताना शिक्षणाची गोडी टिकावी हाच प्रामाणिक हेतू घेऊन सुरू झालाय गंमत गल्ली शाळा हा प्रयोग ! त्याचं गल्लीतील मोठे दादा, ताईच्या मदतीने एखाद्या मंदिरात , मोठ्या हॉल मध्ये , किंवा जिथं सावली मिळेल तिथे उघड्यावर भरते ही शाळा , हिला नाही वेळापत्रक , ना घंटा त्याचं गल्लीतील मोठे भाऊ बहीण शिकवत असतात आपल्या छोट्या भावा बहिणाला !

सुरुवात होते तीन ओमकार व मग प्रत्येकांने आपण काल दिवसभरात काय चांगल्या गोष्टी केल्या व आपल्या हातून काय चुकीचं घडलं हे सांगायचं ! मग काय मुलं म्हणतील तो तास !
मग कधी गोष्टीचा तास तर कधी हस्ताक्षर सुधारण्याचा तास , तर कधी गणित तर कधी विज्ञानाचे प्रयोग ! कधी नुसती बालगीते म्हणायचा तास ! कधी नुसता खेळाचं तास ! तर कधी नुसता गप्पा मारायचा ! त्याला कोणता अवघड विषय नाही फक्त प्रत्येकाने मनात येईल ते नुसता बोलत राहायचं. ना परीक्षेची भीती , ना अभ्यासक्रम संपवायची लगभग,ना स्वाध्याय , ना छडी ! हे सगळं करताना शिकणं झालं पाहिजे हेच गंमत गल्ली शाळेचं सूत्र.
मात्र घराचा अभ्यास नियमितपणे रोज करायचा .आपल्या दादाने सांगितलेली गोष्ट घरी सगळ्यांना सांगायची , आजी , आजोबा यांना गल्ली गंमत शाळेत शिकलेले गणित कसं केलं हे सांगायचे तर कधी बाहेर असणारे पशु पक्षी पाने फुले यांच निरिक्षण करायचं व त्यातील वेगळेपण टिपुन ताई -दादाला सांगायचं.कधी भाजी तर कधी भात-पुलाव तयार करायचा , तर कधी दुधा पासून दही बनवायची तर , कधी कडधान्याला मोड आणून खायचं , तर कधी एक झाड लावायचं व ते जगलं पाहिजे यासाठी काळजी घ्यायची .तरी कधी घरी जमा झालेला टाकून कचरा गोळा करायचा व त्यापासून उपयोगी वस्तू बनवायची हाच गंमत गल्ली शाळेचा घर अभ्यास .
माहिती नाही कोरोनाचं हे संकट कधी संपेल? भविष्यातील शिक्षण कसं असेल ? मात्र गंमत गल्ली शाळा मुलांना आवडत आहे. आपणही आपल्या गल्लीतील 8 ते 10 मुलांना एकत्र करा व शिक्षणाची गोडी टिकावी म्हणून नक्की प्रयत्न करा.
आमच्या विद्यार्थ्यांचे पालक हे शेतमजूर, मिल कामगार आहेत. सध्या करोना मुले शिरोळ तालुक्यात सर्वच उद्योग, अगदी शेतीची कामेही अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने संपुष्टात आली आहेत.
गेल्या २ महिन्यात आम्ही CSR व इतर मार्गांनी funding मिळवण्याचा अथक प्रयत्न केला, proposal तयार केले. HNI (High Network Individuals) / दानशूर व्यक्तींशी/संस्थाशी संपर्क साधला, मात्र करसवलत देणारी ८०ग व १२अ प्रमाणपत्रे आमच्याकडे उपलब्ध नसल्याने या मार्गाने निधी येण्याची शक्यता कमीच आहे.

आम्ही ८०ग व १२अ (80G, 12A) प्रमाणपत्रांसाठी प्रयत्न करत आहोत, मात्र मुंबईतील संबंधित कार्यालये अनिश्चित काळासाठी बंद आहेत.

अशा परिस्थितीत वाचकहो,आम्ही आपल्या आर्थिक मदतीचे आवाहन या ठिकाणी करत आहोत. टाळेबंदीमुळे आज सारी अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे याची आम्हालाही कल्पना आहे, मात्र या मुलांचे शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यच ठप्प होऊ न देण्यासाठी आपण यथाशक्ती आम्हाला मदत करा. 

गंमत गल्ली शाळेतील एका मुलाच्या शिक्षणाचा मासिक खर्च १०००/- रुपये आहे.

विनयक -9420608084 सार्शा – 8999943595

आपले विदयोदय मुक्तांगण परिवार …