Post-लॉकडाउन प्रवास आणि आंब्यांच्या आजीचे घर

२३ मार्च , २०२० पासून सरकारच्या आदेशानुसार कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन चे आदेश होते. या दरम्यान आम्ही लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून online शिक्षणाशी मैत्री केली होती. मार्च ते सप्टेंबर या काळात बाहेर कुठे पडताच आले नाही. कोरोनाचा संसर्ग थोडा कमी झाल्यावर लॉकडाऊनचे निर्बध थोडे शीतिल झाल्यावर आम्ही दोघांनीही थोडी निसर्ग भ्रमंती करावी या उद्देशाने कोल्हापूर जिल्हातील शाहुवाडी तालुक्यातील आंबा गाव या ठिकाणी काही दिसत जाण्याचा बेत केला.


आंबा गाव हे शाहूवाडी तालुक्यातील शेवटचे गाव. निसर्ग सौंदर्याने व जैवविविधतेने नटलेले त्यामुळे online काम, वाचन करत आम्ही आम्ही सकाळ संध्याकाळ निसर्ग भ्रमंती करायचो.निसर्ग खूप उर्जा देतो याची प्रचीती क्षणोक्षणी येत होती. त्यामुळे खूप छान वाटत होते. मनोली धरण, आम्बेश्वर व आदिशष्टाई देवराई , जंगल भ्रमंती इ. अनेक गोष्टी चालू होत्या.


आमचे मार्गदर्शक गद्रे काकांच्या बोलण्यात येथील धनगरवाड्याचा संदर्भ नक्की यायचा. तेव्हा या धनगर वाड्यांनाही भेट देवू या उद्देशाने एक दिवस आम्ही दुपारच्या वेळी बोरमाळ धनगरवाड्याला भेट देण्यासाठी गेलो.जाण्यासाठीचा रस्ता हा काहीठिकाणी खूपच चढीचा तर काही ठिकाणी खूपच उतारीचा होतो. त्यामुळे दोन-तीन वेळा आमची गाडी बंद पडून मागे घसरू लागली होती. या रस्त्यावरचा प्रवास म्हणजे अडथळ्याची शर्यत पार करण्याचा अनुभव आला. कसे-बसे आम्ही त्या धनगरवाड्या पर्यत पोहोचलो. वाड्यात पोहचल्यावर तिथे एका भिंतीवर १० वीत ६० % पडलेल्या महादेवचा डीजिटल बनर दिसला दिसला सहज चौकशी केली तरी महादेव व त्याचे काही मित्र भेटायला आले. त्या मुलांशी मैत्री व्हावी म्हणून त्यांना आम्ही म्हणालो, ‘तुमचं बोरंमाळ बघायालो आलोय.’ तेव्हा राज म्हणाला, ‘चला तुम्हाला आम्ही वरून धबधबा दाखवतो.’ या मुलांनी आम्हाला पाउल वाटेने गप्पा मारत बोरमाळचा धबधबा वरून दाखवला.

वरून धबधबा

गप्पा मध्ये खूप साऱ्या गोष्टी कळाल्या. धनगर वाड्यात मोजून २० घरे आहेत . यातील सगळे कर्ते पुरुष व महिला हे मुबईला घरकाम, बांधकाम मजूर म्हणून स्थलांतरित झालेले आहेत . वाड्यावर काही म्हतारी जोडपी व लहान मुले इतकच काही संख्या. वाड्यावर शाळा ४ थी पर्यत आहे . ५वीच्या पुढे चांदोली (जिल्हा-सांगली) गावाला जावे लागते. शाळेत पोहोचला तीन तास लागतात. प्रचंड चढ- उतार मुळे सायकली वापरता येत नाहीत. ७ वी च्या पुढे तर आंबा गावात हायस्कूलसाठी ९ किमी अंतर चालत जावे लागते. पाड्यातील मुलेचं हायस्कूलला जातात. मुलींची शाळा सातवी नंतर सुटते. असे अनेक गोष्टी मुलांनी आंम्हाला सांगितल्या. व मुलांच्या बोलण्यातून येथील भौगोलिक परिस्थितीमुळे अनेक मुले – मुली त्यांच्या शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहतात हे कळाले.

आम्ही दुपारीचे जेवण सोबत नेले होते, त्यामुळे ‘आमच्या बरोबर जेवयाला या ! आपण शाळेत जेवयला बसू!’ असं बोलल्यावर १०- १५ मुलांनी घरातून जेवणाची ताटे आणली व आम्ही सगळ्यांनी एकत्र जेवणाचा आनंद घेतला. जेवणानंतर आम्ही खेळ, गाणी, गोष्टी घेतल्या आम्ही परतीच्या वाटेवर निघालो.

त्यानंतर पुढील तीन दिवस आम्ही चांदोली, घोळसवडे, आंबा गावातील मुलांच्या कार्यशाळा घेतल्या. परिसरात निसर्ग भ्रमंतीबरोबरच तेथील दुर्गम भागातील वाड्या-वस्तीवरील मुलांबरोबर विज्ञान व जीवन कौशल्य विकासाची कार्यशाळा घेतल्या, यांचे समाधानआम्हाला मिळाले. पुढे काहीतरी नक्कीच भरीव योगदान या भागामध्ये करू, असा आम्ही संकल्प सोडला आहे.

खेळानंतर फोटोसाठी पोझ देणारी आंबा खोऱ्यातील मुले

८ दिवस आंब्यात राहिल्यावर शेवटी घराचेकडचे वेध लागल्यावर आम्ही परतीचा वाटेवर ‘आंब्यात आलात तर त्यात खेडे व शित्तुर गावातील नक्की भेट द्या,’ असे काही अनेक सृजनयात्रेमधील मित्रांनी आग्रह धरला त्यामुळे आम्ही आमचा रस्ता वळवून खेडे गावात मित्राबरोबर एक दिवस घालवला. शितूर गावात भेट देल्यावर एका मित्राने ‘येथील दोन मुलांना आम्ही शैक्षणिक मदत करतो, त्यांना भेटून येऊ’, असा प्रेमळ आग्रह धरला. त्यामुळे आम्ही त्या मुलांना भेटण्यासाठी गेलो.

एका कॉटवर बसलेली दोन मुले ! एक मोठा १० वीला, तर लहान ७ वी ला मोठ्या भावाला मागील वर्षी एकएाकी कंबरेतून जीव गेला. तर मार्च महिन्यात लहान भावाचाही कंबरेच्या खाली जीव गेला आहे. दोघंही प्रचंड हुशार, पण न समजणाऱ्या याआजारामुळे दोघेही अडचणीत आहेत. या मुलांना शिक्षणाचे महत्व सांगून त्यांच्या आईवडिलांचे समुपदेशन करण्यात आले. त्याच्या पुढील शिक्षण व उपचारासाठी आम्ही प्रयत्न करू हे धीराचे शब्द आम्ही देवून आलो आहोत.

आजींचे पडझड झालेले घर

या मुलांना भेट देवून आम्ही गाडीकडे जाणार, त्याच दरम्यान या मुलांच्या घराच्या ओळीत असणाऱ्या एका पडक्या घराजवळ बसलेल्या आजीकडे लक्ष गेलं. आम्ही उत्सुकतेने आजीची चौकशी केली आणि काळीज पिळवून टाकणारे सत्य समोर आलं.

गेल्या वर्षी महापुरात आजीचं घर पडलं व त्यांना महापुराच्या शासनाच्या आर्थिक मदतीच्या यादीत त्याचं नावाचं नाही आलं, अशी प्राथमिक माहिती कळाली. आजींचा नवरा 10 – 12 वर्षांपूर्वी जग सोडून गेला . पोटाला एकच मुलगा. त्याने 10 वी पर्यत शिक्षण घेतले आहे. तो हॉटेलच्या कामासाठी कोल्हापूरात असतो. तो सहा महिन्यांतुन कधीतरी एक- दोन दिवसासाठी घरी येतो. गावातील संवेदनशील प्राथमिक शिक्षक देसाई सर आजींना मासिक किराणा पोहोच करतात.

बोलता बोलता आजींच्या उंबरठ्याच्या आत पाऊल ठेवला. तर कायम भिजून थंड झालेली मातीची जमीन बर्फासारखी वाटतं होती. अशा जमिनीवर आजी राहतात या विचारानेच मन सुन्न झाले. आजी थोडं आपले हात लपवत होत्या. आजींना म्हणालो आम्ही काहीतरी तुमच्यासाठी करू ! तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे बदलले .

येताना माझ्या मित्रांनी आजींना सहज प्रश्न विचारला तुम्ही कामाला का जात नाही ? तेव्हा त्या म्हणाल्या माझ्या हातानी काम करता येत नाही ! आम्हाला कळाले नाही मग आम्ही त्यांना हात दाखवा म्हणालो तेव्हा लक्षात आले त्याचा डाव हात निम्यापासून नाही तर उजव्या हाताला बोटे नाहीत. हे पाहून अजून विदारक सत्य समोर आलं व सुरुवातीपासून त्या हात का लपवत होत्या हे समजलं..

एक ग्रामस्थ आजीची पुरानंतरची कैफियत सांगताना https://www.facebook.com/100002296745675/videos/pcb.3404410739645451/3404409276312264


आम्ही काही समविचारी मित्रांनी त्या आजीना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे काही मदत गोळा केली आहे. लवकरच त्या आजीना ऊन, वारा , पाउस यापासून रक्षण होणारे चांगले छप्पर तयार होईल.

आजीना मदत करण्याचे आवाहन करणारी Facebook पोस्ट : १३ ऑक्टोबर , २०२०. https://www.facebook.com/vianayak.mali/posts/3404410739645451

आजी आणि घर

लॉकडाउननंतरचा ही १० दिवसाचा प्रवास खूप काही शिकवून गेला. शेवटी माणसाने माणसाशी माणसासम वागणे या प्रार्थनेच्या काही ओळीची परत एकदा प्रचिती देवून गेल्या .

धन्यवाद.
सार्शा-विनायक
विद्योदय मुक्तांगण परिवार, अब्दुल लाट , इचलकरंजी

ता.क. : समाजाच्या सर्व स्तरातून एकाच दिवसात Facebook वरून हजारो मदतीचे हात सरसावले : https://www.facebook.com/vianayak.mali/posts/3406708156082376

Published by VMPF

Vidyoday is an organisation started by like minded youth with an aim to reforming society through innovations in education. We believe that in order to come up with a long term solution for contemporary problems, the society is waiting for a much needed reform in education which has the capacity to reach each individual and shape the entire society

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: