12 January 2018 : दोन वर्षे पूर्ण होताना

दोन वर्षे पूर्ण होताना…..

युवा दिनाच्या शुभेच्छा !!

१२ जानेवारी, २०१६ आम्ही काही मित्रांनी सुरु केलेल्या शैक्षणिक चळवलीला २ वर्षे पूर्ण होतील. हा लेख लिहिताना मी लिहीलेल्या याच दिनानिमित्ताचे मागच्या २ वर्षाचे लेख वाचले व हसू आले.आपण २ वर्षे पूर्ण केली याचा सार्थ अभिमानही वाटला. आम्ही मित्रांनी सुरु केलेली ही धडपड आता आकार घेत आहे.

मला बरेच मित्र भेटतात. तु छान काम करत आहेस म्हणून ! कौतुक करतात.मात्र  परवा एक मित्र म्हणाला तू काम चांगल करतोयस पण काय करतोयस हे अजून कळला नाही म्हणून चेष्टाही केली. पण मज्जा आहे यात हे नक्की. तू हे का करतोस असे प्रश्न येतात तेव्हा माझं उत्तर ठरेललं. आनंदासाठी. 

माझ्या शाळेतील माझे शिक्षक एका कार्यक्रम भेटले व म्हणाले विनायक तुझ काम छान सुरु आहे. आम्हाला अभिमान वाटतो. पण तू करिअरकडे पण लक्ष दे. तू स्पर्धा परीक्षाची तयारी का थांबवलीस,असे अनेक प्रश्न ! 

मला काही उत्तर देता येईना. पण शेवटी म्हणालो माझ्या या कामात कोणीच माझ्याशी स्पर्धा करायला तयार नाही म्हणून हा मार्ग निवडला आहे.अश्या बऱ्याच गंमती होत असतात.

2017 मध्ये आम्ही केलेल्या कामाचा थोडक्यात लेखाजोखा घ्यायचा असं म्हणल्यास रविवारच्या कौशल्य शाळा पाच गावामध्ये सुरू झाल्या आहेत.त्याचा 240 मुलं लाभ घेत आहेत. 

गेल्या वर्षी सुरू केलेल्या सेवांकुर साखर शाळेचा उपक्रम तीन गावात सुरू झाला. त्यात 65 ऊसतोड मजुरांच्या मुलांची शिकण्याची गोडी टिकवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. हस्ताक्षर सुधार कार्यशाळेचा 500 मुलांनी लाभ घेतला.

गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन पूजनीय व्यक्तीनी आमच्या कामाची दखल घेतली. कोल्हापूर जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी मा. इंद्रजित देशमुख काकाजी यांनी शिवम प्रतिष्ठान मार्फत होणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठं बालसंस्कार शिबिर घेण्याची जबाबदारी आम्हाला दिली. तसेच उपक्रमशील शिक्षकांसाठी चालवल्या गेलेल्या गुरुजन ह्रदय संमेलन यशस्वी पार पाडले.त्याचा २५० शिक्षकांनी लाभ घेतला. 

तसेच सिध्दगिरी मठ कणेरी मठाचे मठाधिपती प.पु अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींनी मठामार्फत राबविण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा वाचाव्यात, तिथं गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे यांसाठी विद्या चेतना उपक्रमातील १३० शिक्षण मित्रांची क्षमता संर्वधन कार्यक्रमाची जबाबदारी दिली. 

२०१७ वर्षात Wipro seeding program ची Fellowship तसेच तसेच Teach for India entrepreneurs ची TFIx Fellowship मिळाली.

(विद्योदयला मिळणाऱ्या अमुल्य पाठिंब्याबद्दल इथे सविस्तर पहा.)

अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, ही तर सुरुवात आहे.

यासाठी आपल्या सर्वांची साथ मोलाची.

विदयोदय मुक्तांगण परिवा

Published by VMPF

Vidyoday is an organisation started by like minded youth with an aim to reforming society through innovations in education. We believe that in order to come up with a long term solution for contemporary problems, the society is waiting for a much needed reform in education which has the capacity to reach each individual and shape the entire society

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: